कोम्बिंग ऑपरेशन, 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान !


गडचिरोली, दिनांक 14 – नक्षलवादाविरोधात पोलिसांना मोठे यश मिळाळ्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील मुरूम गावात मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथकाने एकूण 26 नक्षलवाद्यांना ठार केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये माओवादी नेता मिलींद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.

कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. आज सकाळीच पोलिसांना मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून लपलेल्या नक्षलवाद्यांना ठार केलं. यामध्ये मिलींद तेलतुंबडेदेखील ठार झाल्याचं माहिती मिळतं आहे.

नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या या चकमकीत पोलिस पथकातील तीन जवान मात्र गंभीर जखमी झाले. या जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. नक्षलवाद्याविरोधातील कोम्बिंग ऑपरेशनला पोलिसांना यश मिळाले.

मिलींद तेलतुंबडे हा माओवादी नेता होता. तो मागील अनेक वर्षे नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय होता. तेलतुबंडे हा मुळचा वणी येथील असून त्याने भाकप माओवादी पक्षाच्या सचिवपदी काम पाहिलेलं आहे. तसेच मिलींद तेलतुंबडे हा लेखक आनंद तेलतुंबडे यांचा छोटा भाऊ आहे. त्याच्या मृत्यूमुळे नक्षलवाद्यांची ताकद कमी होणार आहे, अशी माहिती एका वेबसाईट ने प्रसारित दिली आहे.


 

Leave a Comment