अर्जुनी मोरगाव तालुक्यात महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी.



गोंदिया, अर्जुनी-मोर, संतोष रोकडे, दिनांक – 11 ऑक्टोबर 2021 – उत्तर प्रदेशातील लखिंपुर येथील घटनेचा निषेध करून दोषींना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक 11 ऑक्टोबरला महा विकास आघाडी सरकारच्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र बंद पुकारला होता, त्या अनुषंगाने अर्जुनी-मोर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला, तालुक्यातील अर्जुनी शहर, केसोरी, महागाव , नवेगाव बांध , इट खेडा , बोंडगाव देवी , शिरोली, केसोरी व इतर गावात बाजार पेठ बंद होत्या.

तालुक्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या अकरा वाजता तिनी पक्षातील कार्यकर्ते अर्जुनी-मोर येथील दुर्गा चौकात एकत्र येऊन लखिंपुर घटनेचा निषेध नोंदवत तहसील कार्यालयात पोहोचले व धरणे आंदोलन केले यावेळी झालेल्या सभेत आमदार मनोहर चंद्रिकापुरे , रत्नदीप दहिवले, अर्जुनी-मोर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे, अर्जुनी-मोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे,  राष्ट्रवादीचे यशवंत परशुरामकर शिवसेनेचा शैलेश जायस्वाल,  अश्विन गौतम, चेतन दहीकर, किशोर तरोने , अनिल दहिवले, यांनी लखिंपुर घटनेचा निषेध नोंदवत दोषी ला फाशी व्हावी अशी मागणी केली.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारत सरकार द्वारे पारित केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी उत्तर प्रदेशातील लखिंपुर येथे शांततापूर्ण आंदोलन करीत असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने अत्यंत क्रूर पद्धतीने गाडीखाली चिरडून हत्या केली.

या घटनेच्या निषेधार्थ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी लखिंपुर येथील घटनेला जबाबदार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिष्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना त्वरित फाशी देण्यात यावी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा यावर केंद्र शासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली मागण्यांचे निवेदन अर्जुनी-मोर उपविभागीय अधिकारी श्री अवतारे साहेब यांनी स्वीकारले यावेळी महा विकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उद्धव मेहेंदळे तर आभार प्रदर्शन राकेश रंजन यांनी केले


 

Leave a Comment