फ्रिडम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जखमी माजरेला दिले जीवदान


भंडारा, साकोली, दिनांक – २७ सप्टेंबर २०२१ –  शहरातील प्रभाग ०६ मध्ये आज २६ सप्टें. स. ८ वा. डाकघर मागे स्वास्तिक एजन्सीजवळ बेवारस कुत्र्यांनी घरोघरी जात उंदरांचा नायनाट करणा-या मांजरीवर अचानक हल्ला चढवित जख्मी करून सोडले, त्यातच येथे रहात असलेले सामाजिक कार्यकर्ते आशिष गुप्ता यांना ही बाब दिसताच त्यांनी फ्रिडम टैलेंट एकडमीचे अध्यक्ष किशोर बावणे यांना सुचना देताच पूर्ण फ्रिडम चमु येथे दाखल होत त्या जखमीवस्थेत अर्धमेल्या मांजरास जवळील पशुवैद्यकीय रूग्णालयात नेले व तातडीने येथील कर्मचारी  बोबडे यांनी जखनेवर स्निग्ध औषधोपचार व विटँमिनयुक्त औषधी दिली.

त्यातच काही क्षणात ते मांजर मनसोक्त बागडू लागले हे विशेष.
एका मूक जनावरांना माणूसकीची मिसाल कायम करीत प्राणीप्रेमात मांजराचा जीव वाचवून पुन्हा फ्रिडमने प्राणीसुरक्षेचा मुलमंत्र दिला आहे, यापूर्वीही फ्रिडम संघटनेने वानरांचे पिल्लु, शॉक बसून जखमीवस्थेत वानरे, व इतर मूक जनावरांचे अपघातातून प्राण वाचवित साकोली शहरात एक वेगळीच माणूसकीची ओळख निर्माण केली आहे. या माणुसकीच्या व प्राणीप्रेमात फ्रिडम टैलेंट एकडमीचे अध्यक्ष किशोर बावणे, आशिष गुप्ता, कार्तिक लांजेवार, सागर पुस्तोडे, आदित्य चेडगे, राहुल लंजे, शामराव वरकडे व पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी बोबडे यांनी मूक जनावरांच्या सुरक्षिततेची साकोली शहरात अभिनव मिसाल कायम केली आहे.


 

Leave a Comment