सौन्दड येथील नाव्याने 21 मोफत दाढी / कटिंग करून केला अनोखा वाढदिवस साजरा.


  • वामन सूर्यवंशी यांना अनोखा उपक्रम राबविण्याचा छंद. 


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 12 सप्टेंबर 2021 – सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील रहिवासी वामन किसन सूर्यवंशी हे नाभिक समाजातील नागरिक असून वडीलो पार्जीत पारंपारिक कटिंग/ दाडी चा व्यवसाय आहे, वामन सूर्यवंशी यांनी 12 सप्टेंबर 2021 रोजी सलूनमध्ये तब्बल 21 नागरिकांची मोफत दाढी व कटिंग करून आपला अनोखा वाढदिवस साजरा केला, इतरांपेक्षा वेगळा करण्याचा त्यांचा छंद आहे परिसरात त्यांची वेगळी ओळख देखील आहे.



जिल्हा परिषद प्राथमिक नागरी शाळा सौंदड क्रमांक 1 येथील केजी वन व केजी टू तसेच पितृछाया हरपलेल्या विद्यार्थ्यांचे तब्बल तीन वर्ष पासून मोफत कटिंग करण्याचा उपक्रम देखील त्यांनी केला, त्यांच्या अनोख्या कामा मुळे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते त्यांचे सत्कार देखील करण्यात आले आहे, वडिलांच्या 14 वी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरी कडुनिंबाच्या वृक्षाचे रोपण करून वृक्षारोपण कार्यक्रम देखील साजरा केला होता.



 

Leave a Comment