कृषीदूतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 04 सप्टेंबर 2021 – ङाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील चतुर्थ वर्षाच्या कृषीदूत भूषण गंगाधर मारवाङे, शिवम नरेश ङोये, कमलेश कापगते, भूपेंद्र नाकाङे यांनी सौंदङ येथे बिया व बियाणांचे प्रकार या विषयावर मार्गदर्शन केले.

विद्यार्थीनी बियाणांचे प्रकार या मधे अनूवांशिक बियाणे, प्रजनक बियाणे,पायाभूत बियाणे , नोंदणीकृत बियाणे, प्रमाणित बियाणे, सत्यप्रत बियाणे, तसेच त्यामधील जनूकीय शुद्धता, उत्पादन करणारी संस्था , बियाणांचे स्त्रोत, बीज निरिक्षण चमू , बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून दिलेले वेगवेगळे रंगांचे लेबल, रोग प्रतिकारक बियाणांचा वापर

बीज खरेदी करतांना घ्याव्याची काळजी व उत्तम दर्जाचे उत्पादन मिळवण्यासाठी चांगल्या प्रतीचे बियाणांची निवड कशी करावी या विषयावर विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले या अभ्यासक्रमा अंतर्गत त्यांना प्राचार्य ङाॅ.बङवाईकर ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रमुख , पी.एस.चोपकर तसेच विषयतज्ञ ब्राम्हणकर यांचे मार्गदर्शन लाभले.


 

Leave a Comment