जनतेच्या समस्या निवारणार्थ आ. चंद्रिकापुरे यांचा जनता दरबार



गोंदिया, दिनांक – 03 – सप्टेंबर – अर्जुनी मोर नगरपंचायत येथे दिनांक २९ ऑगस्ट रोजी येथील प्रभाग क्र १ ते १७ च्या समस्या जाणून घेण्याबाबत प्रभागातील प्रत्येकी पाच प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी यांना चर्चेकरिता बोलावले, त्यांच्या समस्या विषयी माहिती घेतली, घरकुल समस्या, शासकीय आरोग्य, शौचालय, नाल्या बाबत , अंगणवाडी दुरुस्ती, राशन वाटप , घरकुल भूखंड वाटप समस्या, पाणीवाटप समस्या, या विषय मुख्याधिकारी नगरपंचायत शिल्पाराणी जाधव नगरपंचायत अधिकारी ,कर्मचारी व अर्जुनी/मोर येथील प्रभाग क्र १ ते १७ च्या नागरिकाशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

नगर पंचायत अर्जुनी/मोर येथे या संदर्भात मुख्याधिकारी व नागरिकाशी चर्चा केली रमाई घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना, भुखंडाचे तसेच वरील सर्व विषयाचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश मा आमदार यांनी मुख्यधिकारी यांना दिले. सदर चर्चेत मुख्यधिकारी व नगरपंचायतील अधिकारी सर्व १७ प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


 

Leave a Comment