गोंदिया, अर्जुनी मोरगाव, दिनांक – 16 ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय, भाजपा कार्यालयासह तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहनाणे राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्यासाठी प्रानांची आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यात आले. तहसील कार्यालयात प्रभारी उपविभागीय अधिकारी विनोद मेश्राम यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ठाणेदार महादेव तोदले, सपोनि प्रशांत भुते यांनी पथसंचलन करीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कोरोना महामारी काळात आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभारी अधिकारी निमजे ,नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी विजय राऊत, नायब तहसीलदार मुनीश्वर गेडाम, मनिषा देशमुख उपस्थित होते.
तसेच स्थानिक भाजपा कार्यालयात तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ.गजानन डोंगरवार, डॉ. नाजूक कुंभरे, लांजेवार, केवळराम पुस्तोडे, विजय कापगते, लायकराम भेंडारकर, नूतनलाल सोनवाणे, रचना गहाणे, यशकुमार शहारे, गिरीश बागडे उपस्थित होते