गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 04 ऑगस्ट 2021 – लोहिया शिक्षण संस्था सौंदड द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथून एच.एस.सी.परीक्षा -2021करिता विज्ञान शाखेतून प्रविष्ट झालेले 69 विद्यार्थी व कला शाखेतील प्रविष्ट झालेले 90 विद्यार्थी असे दोन्ही शाखेतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 100 टक्के लागलेला आहे.
विज्ञान शाखेतून कू.हिना मेश्राम हिने 95.50 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक, कू.जागृती भिवगडे हिने 94.83 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर शशांक बडोले याने 92.66 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विज्ञान शाखेत 90 टक्केच्या वर 06 विद्यार्थी,प्राविण्य श्रेणीत52 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 11विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान आय.टी.चा निकाल100 टक्के आहे. कला शाखेत दुर्वास ब्रम्हणकर याने 92.33 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक,गौरव गायधने याने 86.46 टक्के गुण घेऊन द्वितीय तर भुमेश्र्वरी गोबाडे हिने 84.66 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला शाखेत 90 टक्केचा वर 1 तर प्रविण्य श्रेणीत 30 व प्रथम श्रेणीत 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कोविड -19 मुळे सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार इयत्ता 12वी चा निकाल बोर्डाद्वारे घोषित करण्यात आला आहे. यावेळी विद्यालयातून 90 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मा.जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष ,लो. शि.संस्था यांनी पुष्पगुच्छ देऊन, ” जीवनात यशाचे उत्तुंग शिखरे पादाक्रांत करा, आणि अखिल मानवजातीची सेवा करा!” असे मोलाचे मार्गदर्शन करून अभिनंदन केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थापक – अध्यक्ष मा.जगदीश लोहिया ,प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.