सरपंच पद कायम राहावे म्हणून या सरपंचाने चक्क पाडले घर !



गडचिरोली, चामोर्शी, विशेष प्रतिनिधी – दिनांक – 03 ऑगस्ट 2021 – लोक प्रतिनिधी अतिक्रमण मुक्त राहावे या साठी शासनाने काढलेला कायदा आता अनेकांच्या जीवावरच उठला की काय असे चित्र दिसत आहे. अतिक्रम करणारे लोक प्रतिनिधी आपला पद शाबूत राहावे या साठी अनेक तीगळम बाजी करीत असतात त्यातील हे एक उदाहरण आपल्या समोर आहे.  एका सरपंचाने आपले राहते घर चक्क जेसीबी ने तोडल्याची आता चर्चा जोमात चालू आहे.

अतिक्रमण करून सरपंच होण्यापूर्वी बांधलेल्या घराला चक्क सरपंचांनी सरपंचपदासाठी पाडले. मुधोली चक नं.२ येथील या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकाच चर्चेला उधाण आले.
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते.

अज्ञात इसमाने त्यांच्या अतिक्रमण विरुद्ध ग्रामपंचायत मध्ये नमुना आठ ची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवक यांनी सरपंच यांना कळवताच आज दिनांक ३१ जुलै रोजी सरपंच पद कायम राहावे यासाठी सरपंचांनी आपले घर पाडले त्यामुळे आजच्या काळात लोकांना सरपंच पद किती प्रिय आहे.

हे यातून पाहायला मिळते. राज्य निवडणूक आयोगाने अतिक्रमण धारकांना सर्व ग्रामपंचायत सदस्य होण्यापासून परावृत्त करण्यासाठी अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते , त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांची पदर रिक्त झाली त्याच भीतीने येथील सरपंच यांनी देखील आपले घर पाडल्याचे बोलले जात आहे, असे वृत्त समाज माध्यमांवर आता दिसत आहे.


 

Leave a Comment