पत्रकाराची हत्या करण्यासाठी आर्थिक मदत करणारा व्यापारी झाला सह आरोपी.



  • राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून हत्या झाली होती.

अहमदनगर  वृत्तसेवा, दिनांक – 30 जून 2021 – पत्रकार दातीर आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके श्रीरामपुर यांचेकडे वर्ग होताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे यास नेवासा फाटा येथून तर दुसरा आरोपी अक्षय कुलथे यास उत्तरप्रदेश येथून शिताफीने अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना व्यापारी अनिल गावडे याने आरोपी कान्हु मोरे यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाही, अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु राहुरी पोलिसांनी व्यापारी अनिल गावडे यास सह आरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे कलम वाढवून न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त अहमदनगर लाईव्ह 24 .कॉम ने  नुकतेच प्रकाशित केले आहे.


 

Leave a Comment