आज डव्वा येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन


सडक अर्जुनी, दिनांक : १० फेब्रुवारी २०२३ : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर च्या सौजन्याने तालुक्यातील डव्वा पळसगाव येथे आज १० फेब्रुवारी रोजी बिरसा मुंडा यांच्या पटांगणात मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक टिकाराम भेंडारकर नागपूर यांचे हस्ते, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि. राजकुमार बडोले, जी प सदस्य डॉ. भूमेश्वर पटले, प स सदस्य चेतन वडगाये, डव्वा येथील सरपंच योगेश्वरी चौधरी, तमुस अध्यक्ष झामा चौधरी, उपाध्यक्ष नरेश प्रधान, माजी जी प सदस्य किरण गावराने, माजी प स सदस्य जयशीला जोशी, डॉ. डी बी राहगडाले, माजी सरपंच वंदना दिहारी, शारदाताई किरसान, मायाताई चौधरी, पुष्पमाला बडोले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष लोमेश्वर कुरसुंगे, तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 6.30 वाजता सामूहिक एकतेचे हवन कार्य व तीर्थप्रसाद, सकाळी 8 वाजता मानवधर्माची भव्य शोभायात्रा, दुपारी 12 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी 1 वाजता मानव धर्म शिकवनिवर परिसंवाद व चर्चासत्र, रात्री 7 .00 वाजता सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांचा जाहीर कीर्तन व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परमात्मा एक सेवक डव्वा परिसरातील मार्गदर्शक शालिंदर कापगते यांनी केले आहे.


 

Leave a Comment