सौंदड, दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी ला देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेले हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जगदीश लोहिया, संस्थापक/संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी दोन मिनिटाचे मौन पाळून जगदीश लोहिया, संस्थापक/ संस्थाध्यक्ष यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली पर विचार व्यक्त केले. प्रसंगी गुलाबचंद चिखलोंढे, प्राचार्य रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, मनोज शिंदे, मुख्याध्यापक जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, आर. एन. अग्रवाल, प्राध्यापक, कल्पना काळे पर्यवेक्षिका तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेक्तर कर्मचारी यांनी हुतात्म्यांना आदरांजली दिली.