सौंदड, दिनांक : ०२ जानेवारी २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेह संमेलनाचा समारोप सोहळा दिनांक – ३० डिसेंबर २०२२ ला मा. जगदीश लोहिया, संस्थापक -संस्थाध्यक्ष, लो. शि. संस्था, सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. आ. न. घाटबांधे – उपाध्यक्ष, लो. शि. संस्था, मा. रामभाऊ झोडे, सदस्य लो. शि. संस्था, मा. पंकज लोहिया, सदस्य लो. शि. संस्था, मा. श्रीकांत घाटबांधे, सदस्य, जि. प. गोंदिया, मा. वर्षा शहारे, सदस्य पं. स. सडक अर्जुनी, मा. अनील दीक्षित, पो. पा. कोहमारा, प्राचार्य मा. अनिल मेश्राम, मा. नलीराम चांदेवार विद्यालयाचे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित सरपंच मा. लता गहाणे सरपंच फुटाळा, मा. माधवराव तरोने सरपंच बाम्हणी /स., मा. जयश्री पर्वते सरपंच परसोडी, मा. प्रतिभा भेंडारकर, सरपंच कोहमारा यांचा लोहिया शिक्षण संस्थेच्या वतीने मा. जगदीश लोहिया यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात केला. तसेच मानव विकास योजनेतंर्गत सायकलिंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक- संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांनी “विरोधासाठी विरोध आणि संकुचीत वृत्तीतून इतर देशांवर आक्रमण करून भूभाग जिंकणे भारताची संस्कृती नसून आखिल मानवजातीची सेवा हीच खरी भारतीय संस्कृती असून सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीची उद्दात मूल्ये आत्मसात करून आपली, देशाची व आखिल मानवजातीची सेवा करावी.”असे मार्गदर्शन केले.
माधवराव तरोणे सरपंच बाम्हणी, लता गहाणे सरपंच फुटाळा, जयश्री पर्वते सरपंच परसोडी, श्रीकांत घाटबांधे , वर्षा शहारे, पं. स. सदस्य यांनी विदयार्थ्यांच्या शालेय शिस्तिची, शालेय घटकांची प्रशंसा करून विद्यार्थांना अमोल असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थांनी सादर केलेले ‘नारी शक्ती’ व इतर विषयांवर आधारित मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रमाचे पाहुण्यांनी खूप कौतुक केले. कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य गण, गावकरी, पालक, निमंत्रित पाहुणे, विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्री. डी. ए. दरवडे व कू. यू. बी. डोये यांनी केले, तर आभार स्नेहसंमेलनाच्या संयोजिका की. यू. आर. बाच्छल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.