नागपूर, दिनांक : १२ डिसेंबर २०२२ : ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ( ११ डिसेंबर ) रोजी लोकार्पण झाले. या शानदार सोहळ्यात स्वतः मोदी यांनी ढोलताशा पथकाशी संवाद साधतानाच ढोल पण वाजविला. वायफळ टोलनाकापर्यंत त्यांनी समृद्धी महामार्गावर १० किलोमीटर राईड केली. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या निनादात जल्लोषात त्यांचे या ठिकाणी स्वागत झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, खासदार कृपाल तुमाने, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारआदी अनेक मान्यवर उपस्थित होते.