गोंदियात; राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


गोंदिया, दिनांक : १२ डिसेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केक कापून, केटीएस रुग्णालय व बाई गंगाबाई रूग्णालय येथे रुग्णांना फळ वितरण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे समर्पण, जिद्द आणि दूरदृष्टी समाजासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा देते. आपल्या मार्गदर्शनाने आणि सल्ल्याने आम्ही पुढेही कार्य करीत राहू.

ईश्वर आपल्याला उदंड दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य देवो. श्री जैन पुढे म्हणाले की, खासदार श्री. प्रफुल पटेलजी यांची विकासकामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचा दृढ संकल्प या वाढदिवसा निमित्त आपण सर्वांनी घ्यावा. आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त केटीएस रुग्णालय व बाई गंगाबाई रूग्णालय येथे खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या युवा सहकाऱ्यांच्या सहयोगाने गरजू रुग्णांना फळ वितरण कार्यक्रम करण्यात आला.

या प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, अशोक सहारे, मनोहर वालदे, सुनील भालेराव, विनित सहारे, राजू एन जैन, केतन तुरकर, सौरभ रोकड़े, अधिष्ठता डॉ.घोरपड़े सर, कटरे जी,खालिद पठाण, आशा पाटील, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, मानवती बैस, लता रहागडाले, सोनल मेश्राम, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, मामा बनसोड, टी.एम, पटले,विनायक शर्मा, राज शुक्ला, सौरभ रोकडे, दीपक कनोजे महेश करियार, हरबक्ष गुरणानी, सुनील भजे, राजेश परीहार, राहूल वालदे, दिलीप पाटील, रौनक ठाकूर, कपिल बावानथडे कुणाल बावानथडे, प्रशांत मेश्राम, पंकज चौधरी, शेखर चामट, प्रदीप मदनकर, लव माटे, रोहित लारोकार, अविनाश महावत, नागो सरकार, पंकज गजभिए, राकेश नेवारे, दर्पण वानखेडे, रिषभ मिश्रा, अशीष बले, कुंभलवार जी, शेखर मंडिया, विनय पटले, योगी येडे, नरेंद्र बेलगे, शरभ मिश्रा सहित बहूसंख्येने कार्यकर्ता, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


 

Leave a Comment