ट्रक सह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त.


देवरी, गोंदिया, दिनांक : ०६ डिसेंबर २०२२ : आगामी ग्रामपंचायत निवडणुक असल्याने त्या पार्श्वभुमीवर संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी हे त्यांचे अधिनिस्त असलेले अधिकारी / अंमलदार यांचे सोबत पो.स्टे. देवरी हद्दीत पेट्रोलींग करीत असताना संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांना एक सहा चाकी ट्रक क्र. एम. एच. ४० एके १६६५ हया ट्रक मध्ये संशयीत रित्या माल भरलेला असून देवरी येथील बाजार चौकात उभा असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने या बाबत सहा. पो. नि. आनंदराव घाडगे पो.स्टे. देवरी यांना माहिती देवुन ट्रक मालक यास ट्रक जवळ बोलावुन दोन पंचासमक्ष ट्रक ची पाहणी केली.

असता ट्रक मध्ये ६० ते ७० पांढ-या रंगाच्या पोतडया त्यामध्ये चंदेरी व काळया रंगाचे दगड तसेच लोखंडी तार बंडल, दोन पोतडया तांबा तार असल्याचे दिसुन आले. ट्रक मालकास ट्रक मधील माल कुणाचा आहे व कुठून आणला आहे. बाबत चौकशी केली असता ट्रक मालकाने कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर दिले नाही. ट्रक चालकास त्याचे नाव गाव विचारले असता – सुरेश लालाजी झिंगरे वय ४७ वर्षे रा. वार्ड क्र. १० पंचशिल चौक देवरी असे असुन ट्रक मालक नामे- सुरजमल केशोरीलाल शाहु वय ४९ वर्षे रा. पंचशिल चौक देवरी व्यवसाय कबाडी दुकान असे सांगीतले.

ट्रक मालकास ट्रकमध्ये भरलेल्या मालाचे खरेदी विक्री, साठा तसेच वाहतुक परवाना, मालकी हक्क संबंधाने कागदपत्रे विचारले असता ट्रक मालक याने उडवा उडवीचे व समाधानकारक उत्तर दिले नाही. ट्रक मालक व चालक याने काळया रंगाचे दगड, चंदेरी रंगाचे दगड, लोखंडी तार बंडल, तांबा तार हे त्यांनी कुठूनतरी चोरी करुन किंवा लबाडीने हस्तगत केल्याचे संशय आल्याने दोन पंचासमक्ष ट्रक मधील चंदेरी, काळया रंगाचे दगड , लोखंडी तार बंडल, तांबा तार किं. अंदाजे ५,००,०००/- रु. व ट्रक क्र. एम. एच. ४० एके १६६५ किं. अं. ५,००,०००/- रु. असा एकुण १०,००,०००/- रु. चा माल जप्त करुन कलम ४१ (१)(ड) फौ.प्र. सं. अन्वये ताब्यात घेवुन पो.स्टे. देवरी येथे पुढील कार्यवाहीकरीता देण्यात आले. पुढील तपास सहा. पो. नि. आनंदराव घाडगे, पो.स्टे. देवरी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक गोंदिया निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, संकेत देवळेकर, पोउपनि. मंगेश वानखडे, पो. हवा. वामन पारधी / ११८, पो. हवा. धम्मपाल राऊत / ३७४, पो. हवा. खुशाल पेंदाम / १५५६, पो. ना. देवचंद सोनटक्के / १५७१ यांनी केली आहे.


 

Leave a Comment