अतिवृष्टीमुळे मत्स्यबिज व मासे वाहून गेल्याने सह. सस्थांना नुकसान भरपाई द्यावी – आ. मनोहर चंद्रिकापुरे


गोंदिया, दिनांक : ०४ नोहेंबर २०२२ ;  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्यबिज व विक्रीयोग्य मासे वाहुन गेल्याने मत्स्यमार संस्थावर उपाशी मारीची पाळी आली आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक सहकार्य करावे असे निवेदन दिनांक २ नोव्हेंबर ला गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यात आलेले मा. ना. राधाकृष्ण वीखे पाटील कॅबिनेट मंत्री महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास याना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन मागणी केली. निवेदन देतानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशीवार राकॉप तालुका अध्यक्ष, उमराव मांढरे जिल्हाध्यक्ष मत्स्य विकास आघाडी राकॉप यांनी केली. तसेच मा. ना.सुधीर मुनगंटीवार मत्स्य व्यवसाय व वन मंत्री यांना सुद्धा ईमेल द्वारे निवेदन देऊन मागणी केली.

गोंदिया जिल्हा हा तलावाच्या जिल्हा आहे ११४५ तलाव गोंदिया जिल्ह्यात असून नदी नाले याच्यावर मासेमारी करून उपयोगी करणारा ढीवर समाज मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात १३४ मत्स्यमार सह संस्था आहेत. जिल्हात १०, १३, १४,१५ ऑगस्टला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून तलावातील मत्स्यबीज व मासे वाहून गेल्याने मासेमारी व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुळात त्या समाजातील लोक भूमिहिन असल्याने त्यांचे जीवन जगणे असहय झाला आहे. तरी मासेमार सह संस्थांना नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी निवेदन द्वारे केली आहे.


 

Leave a Comment