कीर्तन हे सुसंस्कारित पिढी आणि समाज प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम – माजी आमदार राजेंद्र जैन


गोंदिया, दिनांक : १३ ऑक्टोंबर २०२२ : तालुका अंतर्गत ग्राम गणेश चौक तांडा येथे गणेश उत्सव समिती द्वारा आयोजित शरद कोजागिरी पौर्णिमा निमित्त राष्ट्रीय कीर्तनकार, प्रबोधनकार वीरेंद्र चन्ने महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते १२ रोजी संपन्न झाले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी शरद कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व किर्तन हे सुसंस्कारित पिढी घडविण्याचे आणि समाज प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन सामाजिक एकता, सलोखा व संस्कार घडवण्याचे तसेच यासारखे समाज जागृतीचे कार्य किर्तनाच्या माध्यमातून केले जाते असे श्री जैन यांनी संबोधन केले. या सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रम याप्रसंगी सर्वश्री राजेंद्रजी जैन, मुनेस रहांगडाले, केतन तुरकर, चेतसिंग परिहार, प्रमोद रहांगडाले, मूलचंद बीसेन, सौ पुष्पाताई कटरे, अशोक सिंह पवार, पुनमचंद चव्हाण, कुंजन चव्हाण, ओम चंद चव्हाण, रौनक ठाकूर सहित मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.


 

Leave a Comment