जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न.


गोंदिया, दिनांक : 13 ऑक्टोंबर 2022 : जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार 10 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याचे सातबारा पट्टे व “आनंदाचा शिधा” दिवाळी भेट किटचे वाटप करण्यात आले.

सभेत जिल्हा नियोजन समिती सभा 30 एप्रिल, 2022 च्या इतिवृत्तास मंजूरी देणे. जिल्हा नियोजन समिती सभा 30 एप्रिल 2022 च्या इतिवृत्तातील कार्यवाही मुद्यांचा आढावा घेणे. 1 एप्रिल 2023 पासून विविध योजनांकरीता देण्यात आलेल्या प्रशासकिय मान्यतांचे पुनर्विलोकन करून मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत नियोजनाचा आढावा घेणे. (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र) व अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांनी संचालन केले.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनील मेंढे, खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार अभिजित वंजारी, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार सहेसराम कोरोटे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.


 

Leave a Comment