- चुकीची कामे करणाऱ्या लोकांची यादी पुन्हा आपण तडीपारच्या सिफारसी करिता पाठविणार – ठाणेदार सचिन वांगडे
गोंदिया, सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक : ०८ सप्टेंबर २०२२ : तालुक्यातील ग्राम पळसगाव येथील चुलबंद नदीतून अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गावकर्यांनी कार्यवाई केली आहे. सध्या चुलबंद नदीला पाणी अशले तरी तालुक्यात रेतीची अवैध रित्या वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ही वाळू कोण कुठून आणते याचा शोध संबंधीत विभागाने घेणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. महसूल विभागाचे काम आता गावकर्यांना करावे लागत आहे. दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ०२ वाजता पळसगावातून राका मार्गाने रेतीचा ट्रक दोन ब्रास रेती भरून जात होता. अश्यात गावातील काही नागरिकांनी काथ्या रंगाचा ट्रक थांबउन त्याला विचार पूस केली मात्र त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नश्ल्याने रेती चोरीचे प्रकरण थांबावे या उद्देश्याने नागरिकांनी पोलिसांना ११२ नंबर वर फोन करून चोरीची माहिती दिली.
दरम्यान डूग्गीपार पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत वाहन जप्ती केले. ही माहिती काही गावकर्यांनी दिली. यात वाहन क्रमांक : एम.एच.३५ ए.जे. १३२८ असे आहे. वाहन चालक नामे : फिरोज नईम खान पठाण वय वर्षे ३५ आणि वाहन मालक संतोष श्रीराम पटले वय वर्षे ४५ असे असून दोन्ही सडक अर्जुनी येथील रहिवासी आहेत. अपराध क्रमांक : २०७/२०२२ असे असून भादवी चे कलम ३७९, १०९ अंतर्गत डूग्गीपार पोलीस स्थानकात फिर्यादी पोलीस शिपाई उद्देभान सुभास रुखमोडे वय वर्ष ३६ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गावडकर चिखली बीट करीत आहेत.
दोन ब्रास अवैध वाळूची किंमत ६,६०० तर वाहनाची किमत ११००,००० लाख रुपये असी एकूण रक्कम ११ लाख ६ हजार ६०० रुपये इतकी आहे. डूग्गीपार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयांच्या अदेश्यावरून जामिनावर सुटका दिली आहे. संतोष पटले हे राजकारणी यंत्रणा बरोबर जुडले आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी तालुक्यातील ३ वाळू माफियांना सहा महिन्यासाठी तडीपार करण्याची शिफारस केली होती. त्यातील 1) दीपक गहाने २) महेश डूम्भरे ३) संतोष पटले यांचा समावेश होता. त्यातील डूम्भरे आणि पटले यांचा तडीपार आदेश आयुक्तांच्या अदेश्यानंतर रद्द करण्यात आला होता. तर गहाणे यांचे आदेश स्थाई ठेवण्यात आले होते. अशी माहिती दरम्यानच्या काळात लोक चर्चेत होती. डूग्गीपार येथील ठाणेदार सचिन वांगडे यांनी सांगितले की चुकीची कामे करणाऱ्या लोकांची यादी पुन्हा आपण तडीपारच्या सिफारसी करिता पाठविणार आहे. त्या मुळे आताच अश्या लोकांनी सावध झाले पाहिजे. अन्यथा कायदा कुणालाही सोडणार नाही. याचे भान आपण सर्वांनी ठेवल पाहिजे.