पुन्हा! अवैध सागवान झाडांची कत्तल, ३ लाख ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, वन रक्षकाला निलंबित करण्याची मागणी.


सडक / अर्जुनी, दिनांक – ०१ जुलै २०२२ – गोंदिया जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यात वन विभागाचे चांगभल !  सतत चर्चेत अश्लेला तालुका पुन्हा पुन्हा चर्चेत विविध कारणाने येत आहे, तालुक्यातून अवैध वाळू उत्खनन, मुरूम, गिट्टी, सह सागवान वृक्षांची कत्तल करून चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या जागेतील हे सर्व प्रकरण समोर येत अशल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात आहेत.

दिनांक – ०५ जून २०२२ रोजी तालुक्यातील ग्राम राजगुडा, सलंगटोला येथील शेतकरी आरोपी नामे; किशन अंताराम मडावी  यांनी वन विभागाच्या गट क्रमांक : १८५ राजगुडा सलंगटोला परिसरातील जागेवर अतिक्रमण करून काही वर्षे पूर्वी शेती केली. तर त्याच शेतातील उभ्या जुन्या चार  वृक्षांची एका ठेकेदाराला विक्री केली.

दरम्यान ठेकेदाराने विना परवाना सागवान वृक्षांची कत्तल करून मंजूर वन जमितील खसर्यात सामील करण्याची तय्यारी दर्शविली. सदर वृक्षांची आजच्या बाजार भाव नुसार ३ लाख ८५ हजार रुपयाचे मुद्देमाल अश्ल्याची माहिती वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी प्रभारी सचिन कटरे यांनी  दिली आहे. सदर संपूर्ण मालाचा पंचनामा करून कापलेली झाडे जप्त करण्यात आली आहेत, यातील ठेकेदार भागवत मुनेस्वर मु; चीरचाडी आणि शेतकरी किशन अंताराम मडावी सालेधारणी असे आहे. यांच्यावर  भारतीय वन गुन्हा अधिनियम १९२७ चे कलम ३३ { १ } [ ए ] अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपीला न्यायालयातून बेल मिळाली आहे.

तर बिटगार्ड दीपक बोदलकर असे असून कोहमारा येथील वनक्षेत्र सहाय्यक नरेंद्र वाढई आहेत, बोदलकर बिट रक्षक यांना निलंबित करण्याची मागणी गावकरी यांनी केली आहे. बिट रक्षकाच्या संगनमताने परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षांची कत्तल केली जात अश्ल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर तसा लेखी स्वरूपाचा निवेदन दिला आहे. यात बाबूलाल कुंभरे, केलास विठोले, रेखलाल टेकाम, राजविलास परतेकी, गोपाल, जीवनलाल, पांडुरंग परतेकी, शामराव कुंभरे सह अन्य गावकरी आहेत, सदर घटनेचा तपास प्रदीप पाटील सहाय्यक वन संरक्षक करीत आहेत.

तालुक्यातील काही ठेकेदार वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने अल्प प्रमाणात खसरा मंजूर करून परिसरातील शेत जमिनीतील झाडांची अवैध रित्या कत्तल करून विक्री करीत अश्ल्याचे अनेक चित्र तालुक्यात पाहण्यासाठी मिळतात. यात परिसरातील नागरिकांच्या जागृती मुळे अनेक प्रकरण तालुक्यात समोर आले आहेत, तर अन्य शेकडो प्ररकरण अंधारात दाबले गेले असावेत असी चर्चा देखील नागरिकात आहे. यावर मुख्य वन संरक्षक कुलराज शिग यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टीम ; महाराष्ट्र केसरी न्यूज


 

 

Leave a Comment