गोंदिया, दिनांक – ०७ जानेवारी २०२२ – दिनांक १७/१२/२०२१ रोजी पहाटे घाटी पळसगाव नहरावरील १७ विद्युत मोटर पंप अज्ञात आरोपींनी चोरून नेले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अर्जुनीमोर येथे अपराध क्रमांक ३६४/२०२१ कलम ३७९, ३४ भादंवि प्रमाणे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपस सपोनि सोमनाथ कदम पो. स्टे अर्जुनीमोर हे करीत होते. अर्जुनी-मोर पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेले भौतिक पुरावे गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून तसेच तांत्रिक व शास्त्रीय माहितीच्या आधारे सर्व आरोपींचा शोध घेऊन भंडारा व चंद्रपूर जिल्हा मधून अटक केलेली आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात चोरी केलेले विद्युत मोटर पंप हस्तगत केलेले होते.
मा. कोर्टाने सर्व विद्युत मोटारपंप शेतकऱ्यांना परत देण्याचा आदेश केल्याने आज दिनांक ०७/०१/२०२२ रोजी अर्जुनी-मोर पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलून विद्युत मोटर पंप सुपूर्त केलेले आहेत. अर्जुनी-मोर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण गोंदिया जिल्हयामध्ये कौतुक होत आहे.
या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक ज्ञानेश्वर बोरकर, प्रशांत बोरकर प्रवीण बहिरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, विजय कोटांगले, श्रीकांत मेश्राम, पोलीस शिपाई लोकेश कोसरे, पोलीस चालक पिल्लारे दीक्षित दमाहे यांनी केला आहे.