सडक अर्जुनी, गोंदिया, दि. – ०६ जानेवारी २०२२ – आज पत्रकार दीन, त्याच बरोबर आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्ताने वैष्णवी रेस्टॉरंट कोहमारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन ! करण्यात आले.
यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बबलू मारवाडे संपादक महाराष्ट्र केसरी न्यूज व रुद्र सागर न्यूज पेपर, सचिव सुधीर शिवणकर एन टीवी मराठी प्रतिनिधी, मार्गदर्शक डॉ. सुशील लाडे संपादक महाराष्ट्र का मानबिंदू व mkm news 24 , सद्स्य सौरभ गोस्वामी आपली खबर मराठी न्यूज व अन्य उपस्थित होते.