सडक अर्जुनी नगरपंचायत निवडणूक पूर्व हालचालींना वेग प्रत्येक प्रभागात मोर्चेबांधणी सुरू


  • नगर पंचायत अंतर्गत परिसराचा खरंच विकास झाला का ?
  • नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी तीन पत्रकारांची तय्यारी.

सडक अर्जुनी, गोंदिया, विशेष प्रतिनिधी, दिनांक – 27 नोव्हेंबर 2021 – नगरपंचायत निवडणुकीचे नव्याने आरक्षण जाहीर झाले आहे. सडक-अर्जुनी नगरपंचायत प्रभागांमध्ये फारसा बदल झालेला नाही, मात्र पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे, आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे , काही माजी नगरसेवक व नगरसेविका ह्या सुद्धा निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे चित्र आता सडक-अर्जुनी नगरपंचायत मध्ये पहावयास मिळत आहे . माजी नगरसेवकांना मतदार पाच वर्षाची विकास कामांचा लेखाजोखा विचारणार असल्याचे दिसत आहे .

नगर पंचायत च्या निवडणुकी साठी मोर्चे बांधणीला सुरवात. 


काही माजी नगरसेवक जिथे जागा सुरक्षित आहे ,त्या प्रभागाच्या शोधात आहेत, मात्र मतदार सुशिक्षित असल्यामुळे प्रभागाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या उमेदवाराला पसंती देत नाही , असे स्पष्ट चित्र दिसत आहे. अशा उमेदवारांना आता मतदारच विचारू लागले आहेत , भाऊ पाच वर्षाच्या काळात किती विकास कामे केलीत, प्रश्नांची उत्तरे देऊन उमेदवारांची दमछाक होत आहे.

नगर पंचायत च्या काही प्रभागातील बंद पडलेले जल शुद्धीकरण यंत्र, यावर विचारणा केली असता काही बंद तर काही चालू असल्याचे सांगितले. 


सडक अर्जुनी नगरपंचायत मध्ये 17 प्रभाग असून सर्वच प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले आहेत , प्रभाग 1 सर्वसाधारण ,प्रभाग 2 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 3 सर्वसाधारण, प्रभाग 4 अनुसूचित जमाती, प्रभाग 5 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 6 अनुसुचित जमाती महिला, प्रभाग 7 अनुसूचित जाती, प्रभाग 8 सर्वसाधारण महिला, प्रभाग 9 सर्वसाधारण ,प्रभाग 10 सर्वसाधारण महिला, प्रभाग 11 सर्वसाधारण, प्रभाग 12 सर्वसाधारण, प्रभाग 13 सर्वसाधारण महिला, प्रभाग 14 सर्वसाधारण महिला, प्रभाग 15 नामाप्र महिला, प्रभाग 16 नामाप्र महिला, प्रभाग 17 नामाप्र याप्रमाणे 17 ही प्रभागाची आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.

नगर पंचायत च्या विविध प्रभागात नाल्यांची देना अवस्था.


मागील गेल्या दहा वर्षापासून नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, त्यापैकी काही माजी नगरसेवक पुन्हा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. वेळप्रसंगी पक्ष बदलावा लागला तरी चालेल, पण आपणास उमेदवारी हवी या अविर्भावात काही उमेदवार असल्याची चर्चा होत आहे, सध्यातरी पक्षात युतीचे कोणतीही हालचाली दिसून येत नाही. सडक अर्जुनी शहरात विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे शहरातच डेरेदाखल असून नगरपंचायतसाठी शासनाकडून साडेसात कोटीचे विशेष निधी मंजूर करून आणले आहेत, त्या निधीतून विकास कामांना सुरुवात झाली आहे. आजी-माजी आमदारांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तथा नगर पंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या आहेत , काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सडक अर्जुनी तालुक्यात निवडणूक जिंकण्याचे समिकरण लावले आहे. भाजपाने ही सर्वच स्तरातून मोर्चेबांधणी केली आहे, भाजपाचे माजी मंत्री राजकुमार बडोले, खासदार सुनील मेंढे, विधान परिषद आमदार परिणय फुके हे सडक-अर्जुनी शहरात तळ ठोकून आहेत, शिवसेनेनेही नगरपंचायत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याचप्रमाणे बाहुबली पॅनल ने सुद्धा आता कंबर कसून निवडणुकीला समोर येत आहे, असे चित्र दिसत आहे.

नगर पंचायत अंतर्गत विकास की भ्रष्टाचार तक्रार दारांचे नाही समाधान, सर्व संग्रहित फोटो. 


मागील पाच वर्षात सडक अर्जुनी नगरपंचायत च्या रस्ते, नाल्या, पिण्याचे पाण्याची व्यवस्था ,बस स्थानक चा विकास पाहिजे ,तसा झाला नाही. जुन्या नगरसेवकांना आता बहुतेक प्रभागातील मतदार पसंत करीत नाहीत. हे विशेष! , नवीन चेहऱ्यांच्या उमेदवारांना जास्त पसंती देऊन निवडून आणण्याचा बेत असल्याचे दिसत आहे . वार्ड क्रमांक एक, तीन , व सतरा व्यां वार्डातीलच उमेदवाराला निवडून देण्याचा मानस असल्याचे दिसून येत आहे , यासाठी वार्डातील उमेदवार सक्षम असल्याचे दिसत आहेत , भूलथापा देऊन निवडून कसे येता येईल, ह्यात जुळवा जुळवी चे समीकरण करीत आहेत , आता मतदारच राजा आहे. आपल्या प्रभागाचा विकास कोण करेल , हेच प्रभागातील मतदारांनी स्वतः ठरवले पाहिजे. सडक अर्जुनी नगरपंचायत मधील जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा , रस्त्याची गैरसोय , वार्डातील नाल्यांची समस्या , आजही कायम आहेत , ह्या समस्या आता येणाऱ्या उमेदवारांना विचारण्याची वेळ आली आहे.


 

Leave a Comment