गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान दिन साजरा


गोंदिया, दिनांक 27 – 26 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालय, रेलटोली गोंदिया येथे, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितित संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्याने परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला अभिवादन करून श्री जैन म्हणाले कि, २६ नोव्हेंबर “संविधान दिवसाच्या” सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी भारताची राज्यघटना अंगीकृत व अधिनियमित करून भारतीय जनतेला अर्पण करण्यात आली. भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या सर्व महान व्यक्तिमत्वांना कोटी कोटी अभिवादन व शुभकामना. तसेच २६ / ११ मुंबई दहशतवादी हल्याचा निषेध करीत हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व शहिदांना श्रदांजली अर्पण केली.

याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, अशोक सहारे, जनकराज गुप्ता, विशाल शेंडे,मनोहर वालदे, आशा पाटील, लता रहांगडाले, केतन तुरकर, भगत ठाकरानी, मयूर दरबार, विनीत सहारे, राजू एन जैन, राजेश दवे, मामा बन्सोड, नागरतन बन्सोड, युनूस शेख, दीपक कनोजे, दिलीप पाटील, गणेश डोये, सतीश पारधी, चंद्रकुमार चुटे, संजीव राय,लखन बहेलिया, प्रतीक भालेराव, सुनील पटले, शैलेश वासनिक, योगी येडे, कान्हा बघेले, कपिल बावणथळे, कुणाल बावणथळे, अमित मेश्राम, दिलीप अग्रवाल, शिशुपाल ठाकूर, विक्रांत तुरकर, दर्पण वानखेडे, लव माटे, गोविंद बावनकर, हरबक्ष गुरुनानी, श्याम चौरे, गोविंद तुरकर, लक्ष्मीकांत डहाट, रौनक ठाकूर, वामन गेडाम, योगेश डोये, प्रमोद कोसरकर, प्रतिक पारधी सहित अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment