गोंदिया, दिनांक – 16 ऑगस्ट 2021 – सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेले हर्ष मोदी यांचा दिनांक – 15 ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला, हर्ष मोदी यांनी विविध सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले, कोरोना काळात करोना प्रारदुर्भाव पसरू नये यासाठी विविध प्रयत्न केले, तसेच त्यांच्या अन्य उत्कृष्ट समाज कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार गोंदिया कॅम्प येथे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमात करण्यात आला.