अनेक गावातील स्ट्रीट लाईनचे कनेक्शन कापल्यामुळे तालुका सरपंच सेवा संघाचे आमदारांना निवेदन सादर


गोंदिया, सडक/ अर्जुनी, दिनांक – 23 जून 2021 – ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या बळकटीकरणासाठी ग्रामपंचायतींना स्ट्रीट लाईनची जोडणी करून त्यांचे विद्युत बिल जिल्हा परिषदेच्या वतीने भरण्यात येत होते, मात्र मागील युती शासनाच्या काळात या योजनेकरीता निधीच न दिल्यामुळे जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीचे पथदिव्यांचे विघृत विभागाच्या अधिकाऱ्याच्या आदेशाने ग्रामपंचायतींना कोणतीही पुर्व सुचना न देता कनेक्शन कापण्यात आले.

ऐन पावसाळ्याच्या दिवसात अनेक ग्रामपंचायतींना पुर्व सुचना न देता विद्युत कनेक्शन कापल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे, त्यामुळे सडक / अर्जुनी सरपंच सेवा संघाच्या वतीने अर्जुनी / मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन देवून पथदिव्यांचे कनेक्शन पुर्ववत करण्याची विनंती केली आहे , निवेदन देतांनी संघटनेचे अध्यक्ष डी , यु . रहांगडाले , सचिव दिनेश कोरे , सल्लागार दिनेश हुकरे , मोहन सुरसाऊत , हेमराज खोटेले यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच उपस्थित होते.


 

Leave a Comment