डुग्गीपार पोलिसांनी आरोपी विरुध्द 24 तासात दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले.


  • पिडीत महीलांना लवकरात लवकर न्याय मिळावा याकरीता शासनाचे धोरण. 

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 23 जून 2021 – महिला अत्याचार संदर्भातील गुन्हे फास्ट ट्रँक कोर्टात चालवुन महीलांना तात्काळ न्याय मिळावा असे शासनाचे धोरण असुन सदर गुन्ह्याच्या निपटारा तात्काळ करणेबाबत मा श्री.विश्व पानसरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे आदेश आहेत.

डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे दि. 22/06/2021 रोजी अपराध क्रमांक 158/021 कलम 354 भादवि. चा गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हा महिला अत्याचार संदर्भात असल्याने पिडीत महीलांना लवकरात लवकर न्याय मिळावा याकरीता ठाणेदार सचिन वांगडे यानी ताबडतोब सपोनि. संजय पांढरे, पो.उपनि. विनोद भुरले, पो.हवा. दिलीप सांदेकर यांची तपास टिम बनवुन आरोपी तन्मय मारोती टेभुर्णे वय 21 वर्ष रा. खोडशिवनी यास तात्काळ अटक करुन गुन्हयातील साक्षदार यांचे बयान नोंदवुन गुन्हयाचा तपास लवकरात लवकर पुर्ण करुन आरोपी विरुध्द 24 तासाचे आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

ठाणेदार सचिन वांगडे यांचे प्रयत्नाने सदर गुन्हयाचा तपास 24 तासात पुर्ण करुन आरोपी विरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले. डुग्गीपार पोलीसांनी केलेल्या कारवाईला कोर्टाने सुध्दा सदर गुन्हा फास्ट ट्रँक कोर्टात चालवुन महिला फिर्यादीस लवकरात लवकर न्याय देण्याची ग्वाही दिली.

सदरची कारवाई मा. श्री विश्व पानसरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री.अशोक बनकर सा.अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी व मा. श्री.जालंदर नालकुल सा. उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सचिन वांगडे पोलीस स्टेशन डुग्गीपार, सपोनि संजय पांढरे, पो.उपनि. विनोद भुरले व तपासी अंमलदार पो.हवा. दिलीप सांदेकर यांनी केली.


 

Leave a Comment