- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात दुसऱ्यांदा सौंदड गावात 50 फुटी रावण दहनाचे कार्यक्रम थाटात संपन्न.
सडक अर्जुनी, दि. 13 ऑक्टोंबर : येणाऱ्या काळा बद्दल बऱ्याच वक्त्यांनी या मंचकावर आपले मत व्यक्त केले, की निवडणुका आहेत, हो निवडणुका आहेत, पण कूणाला निवडून द्यायचे हे आपल्या हातात आहे, कारण बाबा साहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे, मतदान कुणाला कराचा या मंचावरून तुम्हाला मी ठाम सांगतो, अश्याच माणसाला मतदान करायचं जो माणुस तुमच्यासाठी धाऊन येतो असे प्रतिपादन सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी यांनी केले ते आयोजित कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होते.
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत सौंदड व गुरुदेव सेवा मंडळ द्वारा आयोजित भव्य 50 फुटी रावण दहन, आतिषबाजी, व दसरा उत्सवाचे आयोजन येथील हिरबाजी स्टेडियम च्या पटांगणावर दि. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजकुमार बडोले माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुगत चंद्रिकापुरे सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, पंचायत समिती सदस्य वर्षा शहारे, संदीप मोदी गोंदिया जिल्हा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष, माजी सरपंच जगदीश लोहिया, माजी सरपंच हितेश लवंगाणी व ग्रामपंचायत सदस्य सह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते, यावेळी सस्त्रपूजन, झाकी, सत्कार सोहळा, रामायण लघुनाटिका, कुस्त्या, दांडपट्टा सारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान सेकडोच्या संख्येत गावातील नागरिकांनी हजेरी लावली होती, त्याच बरोबर गावातील सर्व समाजातील अध्यक्षांचे सत्कार करण्यात आले.
दरम्यान समोर बोलताना सरपंच मोदी म्हणाले आपल्या तक्रारी घेऊन 100 लोकांन पैकी 99 लोक आमदार खासदार कडे जात नाही, सर्वात पहिले जो माणूस पायरी चढते तो, म्हणजे ग्राम पंचायत ची पायरी चढते, त्याच्या नंतर पंचायत समितीची पायरी चढते, आणि नंतर जिल्हा परिषद ची पायरी चढते, हे आपले सर्वांगीण विकासाचे तीन स्तंभ आहेत, जर यांच्या शब्दाचा तुम्ही मान ठेवलं आणि योग्य वेक्तीला मतदान कराल तर 100 % टक्के मतदान खऱ्या माणसाला जाणार असे ते मंचावरून उपस्थित जन समूहाला मार्गदर्शन करताना बोलत होते.
विजय दशमीचा दिवस म्हणजे असत्यावर सत्याचा विजय : माजी मंत्री राजकुमार बडोले.
या गावामध्ये आमच्या सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणात कामे केली, माननीय देवेंद्र जी फडणवीस साहेबांनी अशक्य कल्पना आम्हा सगळ्यांना दिल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री केलं, आणि लंडन येथील बाबासाहेबांचा घरच नव्हे तर जिथे बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या चैत्यभूमी मध्ये महापरिनिर्वाण झाले त्याच्या बाजूचा इंदु मिलचा आराखडा पूर्ण करण्याचं काम माझ्यासारख्या माणसाला भेटल हे पण मी माझे भाग्य समजतो, खूप कामे करता आली, ओबीसीच्या मंत्रालय वेगळा करण्यात आला, अशी असंख्य कामे करत असताना, सतत आपल्या सगळ्यांचा चेहरा माझ्या डोक्यात होता, म्हणून मंत्री असताना या विधानसभा क्षेत्रात मी दोन दिवस द्यायचो, हे सांगायचं कारण एवढेच आहे, की आता सुरू होतील आश्वासनांच्या मैफिली रस्तो रस्ते घरोघरी इलेक्शन पुरती फक्त लोक येतील, थापा थापी करतील, त्याला बळी पडू नका, आज विजय दशमीचा दिवस म्हणजे असत्यावर सत्याचा विजयाचा प्रतीक म्हणून मानला जातो म्हणून या दिवसाला अधिक महत्व आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंचावरून केले.
आमदार साहेबांनी, या भागाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणली : सुगत दादा चंद्रिकापुरे
प्रधानमंत्री आवास योजनेची असो, आरोग्य विभागाची असो, इलेक्ट्रिक विभागाची असो, कृषी विभागाची असो, आदिवासी विभागाची असो, सामाजिक न्याय विभागाची असो, आजच्या तारखेला महाराष्ट्र शासनाचा असा कुठलाही विभाग नाही, जिथे आपल्या क्षेत्रातील आमदार साहेबांनी आपल्या साठी काही आणले नाही, आणि ते आणण्याचं काही कारण होतं, कारण सुशिक्षित सक्षम नेतृत्व आपल्या क्षेत्राला लाभलं, त्यांचा 34 वर्षातील शासकीय सेवेतील अनुभव प्रशासन आणि शासन कसा चालतो आणि त्याच्या समन्वय कसा होतं या गोष्टींच्या अनुभवामुळे माननीय अजितदादा पवार तसेच माननीय प्रफुल भाई पटेल यांच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणली आहे. असे प्रतिपादन सुगत दादा चंद्रिकापुरे यांनी मंचावरून केले.