अर्जुनी मोर., दि. 15 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली यामुळे अर्जुनी/मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साचले आहे.
शेतकऱ्यांनी लावलेले धान पीक मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीला घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे यांनी अर्जुनी/मोरगाव शहर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. मुख्यमंत्री यांच्या नावाने तहसीलदार यांना निवेदन दिले, तर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा मोठा आंदोलन व रस्त्यावर उतरण्याचा इशारा दरम्यान माजी जि. प. सदस्या किरण कांबळे यांनी दिला आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 87