मुल्ला येथे जन आरोग्य समितीची सभा व आरोग्य शिबिर संपन्न.

लोहारा, दी. 15 सप्टेंबर : प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे आज दी. 14 सप्टेंबर रोजी जन आरोग्य समिती ची सभा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. वरील कार्यक्रम ची अध्यक्षता सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती जि.प. गोंदिया व अध्यक्षा जन आरोग्य समिती मुल्ला यांनी शिबीराचे उद्घाटन व मार्गदर्शन केले, डॉ. ललित कुकडे तालुका आरोग्य अधिकारी, देवरी, डॉ. रामकृष्ण येरने वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. के. मुल्ला व सचिव जन आरोग्य समिती यांनी प्रास्ताविक केलं, जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई वालोदे, पंचायत समिती सदस्या, ममताताई अम्बादे, वैशालीताई पधंरे सरपंच ग्राम पंचायत मुल्ला, कल्पना ताई बागडे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते, रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहागंडाले, डॉ. सुजाता ताराम, डॉ. पालीवाल, डॉ. कोल्हारे यांनी केले. तसेच बल्ड सैम्पल रीना सयाम यांनी घेतला, उपस्थित सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी, उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा फैसीलेटर, यांनी सहकार्य केलं, कार्यक्रमाचे संचालन प्र.वै.अ. पवन कटरे व आभार प्रदर्शन आरोग्य सेवक गौतम यानी केले.

Leave a Comment

और पढ़ें