माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या मंत्र्यांची केली पोलखोल

आमदारकीची तिकीट गेली, जिल्हा परिषदची पण तिकीट गेली, त्यामुळे मी या नेत्यांचे मोबाईल नंबर डिलीट केले, भारतीय जनता पार्टी वैसेभी ओबीसी समर्थक नही है : माजी आमदार रमेश कुथे यांचे आरोप. 

गोंदिया, दिनांक : 22 जून 2024 : माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या सदसत्वाचा राजीनामा दिनांक : 21 जून 2024 रोजी दिला आहे, ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे, नाना पटोले देखील त्यांच्या भेटीला एक आठवड्यापूर्वी आले होते, ते आज दिनांक 22 जून 2024 रोजी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या नेत्यांची त्यांनी पोलखोल केली आहे मात्र सध्या ते कुठल्याही पक्षात जाण्याच्या तयारीत नाही त्यांनी सांगितलं की आपले कार्यकर्ते जे ठरवतील ते मी करणार. 

माजी आमदार रमेश कुथे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी सहा वर्षांपूर्वी बिजेपी मध्ये आलो ती तारीख होती 21, 6 , 2018 आदरणीय गटकरजींच्या नेतृत्वात सडक अर्जुनी येथे, पण त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 19, 6, 20218 रोजी रात्री 12, 01 वाजे नागपूर एअरपोर्टवर सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी यांच्याशी माझी बोलनी झाली होती.

त्यांनी म्हटलं होतं की पक्षात या तुम्हाला 2019 ची आमदारकी देतोय, त्यांना बाहेर देशात जायचे होते, म्हणून त्यांनी सांगितले की गडकरी साहेब 21 तारखेला सडक अर्जुनी येथे येत आहेत, त्यांच्या सभे मध्ये एंट्री करून टाका त्यांच्या सोबत त्यांनी फोन वरून चर्चा पण केली, एन्ट्री केली सर्व वेवस्थित चालले होते, लोकसभा निवडणुक 2019 आली त्यात आमचे आदरणीय फुके साहेब बोलले की भाऊ जिल्ह्याच्या दवऱ्यावर निघा लोकसभेत पाहू l 

डोक्यात काही लोकसभा नव्हती पण फुके साहेब बोलले म्हणजे देवेंद्र जी बोलले, निघालो त्या नंतर काही झाले नाही, ती सीट आमच्या सुनील भाऊ यांना मिळाली, 2029 ची विधान सभा आली, त्या विधान सभे मध्ये एन वेळेवर गोपाल दासजी अग्रवाल आले, ती तिकीट गोपाल दासजिंना दिली, गोपाल दाजजी पराभूत झाले, ती वेगळी गोष्ट आहे, तो ही चान्स आमचा गेला.

त्या नंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक आली, माझ्या मुलाला जिल्हा परिषद ची तिकीट दिली नाही, त्या वेळी मी बोललो, पण त्यांच्याकडे उत्तर नाही, रावण वाडीच्या सभेत आदरणीय देवेंद्र फडणवीस होते, सगळे नेते होते, त्यांच्या समोर बोललो, सभेचे मला निमंत्रण नाही, मी त्या सभेत बोललो माझ्या मुलाला तुम्ही तिकीट दिली नाही, आणि मला निमंत्रण ही दिले नाही, तरी पण मी अश्या करीता आलो की तुम्हाला अस वाटल नाही पाहिजे की मी तुमच्या विरोधात जाणार

आमदारकी ची तिकीट गेली, जिल्हा परिषद ची ही तिकीट गेली.

आणि ते जणते समोर बोललो होतो मी, की माझ्या मुलाला चांगल वाटत असेल तर व्होट द्या नाही तर भारतीय जनता पक्षाच्या कमल फुलाला व्होट द्या. त्याचे भाग्य असेल तर तो जिंकेल किंवा हारेल, जनतेने साथ दिली तो जिंकला, आमदारकी गेली, जिल्हा परिषद तिकीट गेली.

हे सगळ झाल… जिंकल ते वेगळी गोष्ट आहे… डोक्यात काही तरी वेगळ चालू होते, पण 24, 2, 2024 ला लोकसभेच्या पूर्वी पूर्व विदर्भाचे लोक सभेच्या उमेदवाराच्या समर्थनात सगळ्या कार्यकर्त्यांची सभा होती, गडचिरोली, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा – गोंदिया, वर्धा, देशपांडे सभागृह खचाखच भरला होता.

त्यावेळी आदरणीय बावनकुळे साहेब यांनी एक भाषण दिला, त्यात ते बोलले आमच्यापाशी लंबे लंब्या रांगा लागल्या आहेत, खूप खूप लोक येणार आहेत, त्या सगळ्यांना घ्या, ते जे मागतात त्यांना द्या, हो म्हणा, आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही, पण आपण सगळ्यांना हो म्हणू शकतो, सगळ्याच्या मागण्या पूर्ण होणार नाही, आम्हाला माहित आहे, येथील 100 आणि जातील पाच, तरी आम्ही 95% फायद्या मध्ये राहू

विजू तु भी आयाराम मै भी आयाराम, और क्या बोल रहै है देख. 

मी त्या मीटिंगमध्ये समोरच्या रांगेमध्ये बसला होतो, माझ्या बाजूला विजय महादेवराव शिवनगर असले होते, त्यांना बोललो विजू तु भी आयाराम मै भी आयाराम, और क्या बोल रहै है देख, और उस दिन से दिमाग मे आ गया, और कल उसकी पुनरावृत्ती हुई

लेकिन किसी नेता ने मेरा फोन उठाया नही.

कल मुझे पुरे छे साल हो गये भारतीय जनता पार्टी मे, और मैंने कल अपना त्याग पत्र आदरणीय बावनकुळे जी को भेज दिया, पोस्ट से भेजा मैने, क्यू पोस्ट से भेजा, इतनी तयारी होने के बाद भी, व्हाट्सअप वगैरे सब है, मेरे लडके को जब जिल्हा परिषद तिकीट नही मिली, तो मैने दस बार देवेंद्रजी को फोन लगाया, दस बार बावनकुळे जी को फोन लगाया, लेकिन किसी नेता ने मेरा फोन उठाया नही, और उस दिन से मैने इनका नंबर डिलीट कर दिया, इसलिये मैने कल पत्र से राजीनामा दिया.

भारतीय जनता पार्टी वैसेभी ओबीसी समर्थक नही है

ते पुढे बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टी वैसेभी ओबीसी समर्थक नही है, ओबीसी की, हीत की, बात करेंगे ही नही, समजो, चाहे वो मराठा समाज का हो या फिर ओबीसी का हो, चाहेंगे दोनो समाज लडते रहे, और इनका भला हो.

नाना पटोले मला भेटायला आले होते. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या भेटीला आले होते यावर विचारले असता ते पुढे म्हणाले, नाना पटोले यांच्याशी आमचे जुने संबंध आहे, ते लोकसभेच्या वेळी देखील आले होते, प्रशांत पडोळे यांना घेऊन, फक्त उमेदवार आशीर्वाद घेण्याकरता आला होता, त्यानंतर एका लग्नात नानाभाऊ आले होते, मी त्या लग्नात गेलो नव्हतो कारण माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झालं होते, नानाभाऊ भेटायला आले, बोलने होत राहते, अशी बोलणी झाली भाऊ या स्वागत होईल असा… तसा… येव… तेव…, ठीक आहे, कार्यकर्ता ठरवतील ती माझी भूमिका राहील, सध्या कुठल्या पक्षामध्ये आपण प्रवेश करणार यावर विचारणा केली असता त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही जे कार्यकर्ता ठरवतील ती आपली दिशा राहील असे ते बोलताना म्हणाले. 

Leave a Comment

और पढ़ें