गोंदिया, दी. २१ जून : पाण्याच्या शोधात भरकटलेले एक अस्वल विहिरीत पडल्याची घटना गोंदिया तालुक्यातील चारगाव येथे दी. २० जून रोजी उघडकीस आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल चार तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून अस्वलाला विहिरीबाहेर काढून जंगलात सोडले. सध्या वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने धाव घेत असल्याचे चित्र आहे.
असाच प्रकार गोंदिया तालुक्यातील चारगाव येथे उघडकीस आली. चारगाव येथील शेतकरी रहांगडाले यांचे शेत रस्त्यालगत असून, त्यांच्या शेतात विहीर आहे. शेतकरी शेतात गेले असता त्यांना विहिरीत अस्वल पडले असल्याचे आढळले. त्यांनी लगेच याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. गोंदिया वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत विहिरीत पडलेल्या अस्वलाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण केले.
काही वेळातच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. अस्वलाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला तब्बल चार तास लागले, यानंतर अस्वलाला सुखरूप बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद केले, रेस्कीव टीमने अस्वलाला जंगलात सोडून दिल्याची माहिती वणविभागाणे दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातिल विहीरीना तोंडी नशल्या मुळे वन्यजीव विहीरीमधे पडत अशल्याचे चित्र आहे.
