राहुल गांधी यांचा वाढदिवस तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा

नाना पटोले यांच्या मनात काय ? 

सडक अर्जुनी, दी. २० जून २०२४ : स्थानिक तेजस्विनी लॉन येथे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि अनुसूचित जाती सेल तालुका च्या वतीने साजरा करण्यात आला, अनुसूचित जाती सेल चे  तालुका अध्यक्ष हरीश बनसोड यांचे हस्ते केक कापून १९ जून रोजी जन्मदिवस  साजरा करण्यात आला. यावेळी सडक अर्जुनी तालुक्यातील कार्यकर्ते तेजस्वीनी लॉन येथे आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त जमले होते. यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन घरोटे, माजी सरपंच दिनेश हुकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू मडावी, हरीश कोहळे, राजेश सूर्यवंशी, भोजराज मसराम, मुरली ठाकरे, पप्पू मसराम, डी. डी. शाहारे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सडक अर्जुनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती सेल चे तालुकाध्यक्ष हरीश बनसोड यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा केला, दरम्यान दिनेश हुकरे, हरीश बनसोड यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन व आभार हरीश कोहळे यांनी मानले, दरम्यान विविध विषयावर चर्चा करण्यात आली, येत्या विधान सभा निवडणुकीत अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातून कॉँग्रेस पक्ष कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, विशेष म्हणजे हरिश बनसोड हे देखील या प्रतीक्षेत आहेत, मीडियाशी बोलतांना ते म्हणाले की पक्षाणे मला जबाबदारी दिली तर मी स्वीकारेन म्हणजे आमदारकीची निवडणूक लढण्यास हरिश बनसोड तय्यार आहेत असे लक्ष्यात येते.

नाना पटोले यांच्या मनात काय ? 

कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे १४ जून रोजी गोंदिया दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कॉँग्रेस मध्ये येणार आहेत असे ते म्हणाले, गोंदिया विधान सभा निवडणुकी करिता तिकीट कुणाला देणार असे विचारले असता तिकीट एकालाच देण्यात येईल असे ते म्हणाले, यावर पत्रकारांनी विचारले की तिकीट नवीन की जुन्या कार्यकरत्याला देणार असे विचारले असता जो लोकांच्या जवळचा असेल त्याला तिकीट देऊ असे नाना म्हणाले, पटोले यांच्या बोलण्या नुसार कॉँग्रेस पक्षात आजी माजी आमदारांचा येन वेळेवर पक्ष प्रवेश होऊ शकतो आणि पक्ष त्यांना तिकीट देणार असे चित्र दिसत आहे, असे झाल्यास अनेक वर्षे पासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र पंचायत होईल, म्हणजे आलारे आला लांडगा आला या कथेचा बोध घेण्यासारखा असेल.

कॉँग्रेस च्या तिकीट वरुण अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रात बाहेरील माजी आमदार निवडणूक लडणार अशल्याची चर्चा आहे, मात्र अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रात बाहेरील पार्सल चालणार नाही असे वारे आहेत, दुसरीकडे अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रातून लढन्यासाठी एक माजी मंत्री देखील कॉँग्रेस पक्षाच्या तिकीट करिता धळपळ करीत अशल्याचे बोलले जाते, पक्षाने कार्यकर्त्यांना डावलून अन्य कुणालाही तिकीट दिली तर जनतेचा कॉँग्रेस पक्षावरून विस्वास कमी होण्याची शक्यता आहे, लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधान सभेच्या निवडणुकीत मतांचा फार अंतर आहे, राज्यात पक्ष फोडा फोडी च्या राजकरणा मुळे भाजप पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगलाच झटका पडला अशल्याचे आपण पाहिले आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की विधान सभेत देखील तसे होणार, कॉँग्रेस पक्षात अनेक सक्षम कार्यकर्ते आहेत, ज्यांना विधान सभेची प्रतीक्षा आहे, तशी राज्यात कॉँग्रेस लाट सुरू अशली तरी मतदारांचा कौल मतपेटीतुण समोर येणार.

Leave a Comment

और पढ़ें