सरपंच हर्ष मोदी यांनी पुन्हा केली अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई

सडक अर्जुनी दि. 19 जून 2024 : गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्यातरी रेतीचे घाट लिलाव नाही. अशातच रेतीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेतीची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक करूण बांधकाम धारकांना पुरवली जात आहे. मात्र या अवैध रेती उपशामुळे नदीपात्र खोल होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर गाव रस्त्यांची व शेतीकडे जाणाऱ्या मार्गाची देखील दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे.

गावातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेता सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील महसूल विभागाला एक लेखी निवेदन दिले होते. की सौंदड ते पिंपरी या नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधरित्या वाहतूक होत आहे. त्यावर महसूल विभागाने तात्काळ कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन दिले होते. मात्र महसूल विभाग सध्या निंद्रा अवस्थेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वतः पुढाकार घेत सरपंच हर्ष मोदी व दक्षता समितीचे अध्यक्ष, गावातील काही नागरिक मिळून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे काम केले आहे.

दिनांक 16 जून रोजी सायंकाळी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहन क्रमांक : एम एच 35 ए.जी. 1185 असे असून ट्रॉली क्रमांक नाही सदर वाहनात एक ब्रास वाळू मिळून आली. सदर वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नसल्याने सदर वाहनाचा जप्तीनामा तयार करण्यात आला. वाहन चालक जितेंद्र मेंढे असे असून वाहन मालक शामकुमार मेंढे असे आहे.

दोन्ही चिखली येथील रहिवासी आहेत. यावेळी प्रणय कराळे, मदन साखरे उपस्थित होते तर सदर वाहन महसूल विभागाचे तलाठी हर्ष कुमार उईके, कोतवाल सचिन कोरे, यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. 12 जून रोजी पिपरी घाटावरून अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या एका अन्य वाहनावर सरपंच हर्ष मोदी यांनी वाहन जातीची कारवाई केली होती या दोन्ही वाहनावर महसूल विभाग काय कारवाई करणार हे पाहण्यासारखे असेल.

Leave a Comment

और पढ़ें