गोंदिया, दी. 19 जून : शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिर चौपाटीजवळील विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर वय वर्षे (25) या तरुणाचा विद्युत करंट लागल्याने 18 जून रोजी मृत्यू झाला. त्या पूर्वी केटीएस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोंदिया शहरात मोठ मोठ्या शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, व्यापारी वर्ग, राजकारणी यांचे होर्डिंग नगरपरिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जातात. यासंदर्भात नगरपरिषदेकडे अनेक तक्रारी झाल्या, याबाबत मुख्याधिकाऱ्यांसमोर सामाजिक संघटनांनी आवाज उठवला मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 402