गोंदीया, दि. 19 जुन : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम मेंढकी येथील दिलीप वरठी वय वर्षे (32) या तरुण शेतकऱ्याचा विज पडुन मृत्यु झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. सडक अर्जुनी तालुक्यातील मेढकी येथील दिलीप वरठी हा नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करीत असताना अचानक मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला. अशातच विज पडुन दिलीप घटनास्थळीच कोसळला. लागलीच त्याला सडक अर्जुनी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. घटनेची नोंद डूग्गीपार पोलिसांनी घेतली आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 894