आरोपींचा 20 जुन पर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम
गोंदिया, दि. 16 जुन : जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपये ची फसवणूक करणाऱ्या दोन भावांच्या विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी 7 ते 8 टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष देत त्यांनी अनेक लोकांना लुटले आहे. सुरवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आमगाव शहरातील बनिया मोहल्ला येथील किसन चंपालाल पांडे वय वर्षे (21) व कन्हयालाल चंपालाल पांडे वय वर्षे (24) या दोन आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना 7 ते 8 टक्के प्रमाणे प्रतिमहिना परतावा ( रिटर्न ) देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चलुराज व्यंकटरंगप्पा कमैय्या ( 58 ) यांच्याकडून 1 कोटी 35 लाख घेऊन त्यांना 50 लाख रुपये परत केले तर उर्वरित 85 लाख रुपयाचे चेक दिल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की 1 मई चे चेक होते. आरोपी यांची घरी पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी वाद घालून पूर्ण पैसे दिले आहेत असा आरोप लावत घरून काढून दिले होते.
तक्रारदार यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकी करिता दिले होते. तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 7 टक्के दराने व्याज देऊ, असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमैय्या तयार झाले नाहीत. परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 2012 पासून तक्रारदार यांच्याकडून आरोपींनी 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपये घेऊन सदर रकमेची अफरा तफर केली आहे. फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावावर आमगाव पोलिसांनी भादविच्या कलम 420, 418, 403, 406, 120 (ब) अन्वये गुन्हा 13 जुन रोजी दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून 20 जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात आणखी फसवणूक झाल्यांची नावे समोर येण्याची शक्यता तक्रारदार यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तवली आहे.
प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव.
2012 पासून तक्रारदार यांच्याकडून दोन्ही आरोपींनी 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपये घेऊन सदर रकमेची अफरा तफर करून फसवणूक केली आहे. दोन्ही भावावर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून 20 जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.