दोन्ही आरोपींना 18 जून पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी
अर्जुनी मोर. दि. 13 जुन : इन्सटाग्राम वरून झालेल्या प्रेमाने पतीची गळा आवळून हत्या केली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोर तालुक्यात घडली आहे. प्रेमी व प्रियशिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतक मेघशाम कुंडलिक भावे वय 42 वर्ष रा. ईसापुर तर आरोपी पत्नी वैशाली मेघशाम भावे वय 32 वर्ष रा. ईसापूर असे असून दुसरा आरोपी प्रियकर तेजेराव भुजंग गादगे वय 22 वर्ष राहणार बिलोली जिल्हा नांदेड या दोन्ही आरोपींना पोलिसांनी 12 जून रोजी अटक करून 13 जून रोजी दिवाणी न्यायालय सडक अर्जुनी येथे हजर केले असता दोन्ही आरोपींना 18 जून पर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
आरोपी महिला वैशाली भावे हिचे इंस्टाग्राम वर तेजराव भुजंग गादगे यांचे सोबत दोन वर्षापासून ओळख होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्या ननंतर या दोघाण मध्ये हळू हळू प्रेम झाले. तेजेराव हा अधून मधून वैशालीला भेटण्यासाठी ईसापुर येथे यायचा सदर प्रियकर हा पिकप चालक आहे.
मृतकाच्या पत्नीला सासू- सासरे व पती सोबत राहायचं नव्हतं तिला वेगळे राहायचे होते. त्या मुळे तिने 11 जून रोजी म्हणजे घटनेच्या दिवशी प्रियकर आरोपी याला ईसापुर गावात बोलाऊन घेतले होते. तर आरोपी याला रात्री घरात येन्यासाठी मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. रात्री अंदाजे बारा वाजेच्या सुमारास दोघांनीही गळा आवळुन मृतक मेघशाम भावेचा खून केला. प्रथम दर्शनी आकशमीक मृत्यू झाल्याचे अंदाज होते. त्या मुळे मृतकाच्या अंत विधीचा कार्यक्रम सुरू असताना काही लोकांना मृतकाच्या गळ्यावर दोरीचे वळ दिसून आल्याने त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पाहणी केली असता सन्सस्यास्पद चित्र दिसून आले, त्या मुळे मृतदेहाचा पोस्टमाटम सासकीय रुग्णालयात करण्यात आला त्या मुळे ही गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी पत्नीने देखील दोघे मिळून हत्या केल्याची कबूली दिली, रात्री हत्या केल्या नंतर आरोपी प्रियकर हा निघून गेला होता, गोपनीय माहितीच्या आधारे अर्जुनी मोरगाव पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी पुसद या गावी आहे. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पुसद पोलिसांना कळवून प्रियकर आरोपीला ताब्यात घ्यायला सांगितले, तर अर्जुनी मोरगाव येथील पोलीस पथक पुसदला तत्काळ रवाना झाले, आरोपीला बारा तासाच्या आत ताब्यात घेऊन अर्जुनी मोरगावला आणले.
दोन्ही आरोपीवर कलम 302, 120 ( ब ) भांदवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील तपास करीत आहेत.