अज्ञात वाहनाच्या धडकेत सौंदड येथील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

सडक अर्जुनी, दि. 13 जुन 2024 : साकोली ते देवरी जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर घडली असून सौंदड ते श्रीरामनगर या भागात असलेल्या मोठ्या तलावाजवळ दि. 12 जून रोजी 12 : 30 वाजता दरम्यान घडली आहे.

मृतक पुष्पा संपत बडोले वय 62 वर्ष, रा. शास्त्री वार्ड सौदड, ता. सडक/अर्जुनी असे असून ही आपल्या
ही लहान मुलाच्या चहा नाश्ताच्या दुकानाकडे सौंदड वरून पायदळ जात असतांनी मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने महिलेला धडक दिली. प्रथम दर्शनी महिला जखमी अवस्थेत घटना स्थळी पडली होती. काही नागरिकांनी जखमी महिलेला सौंदड येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी सदर महिला मृतक असल्याची माहिती दिली.

फिर्यादी संदीप संपत बडोले वय 42 वर्ष, रा. शास्त्री वार्ड सौदड, ता. सडक/अर्जुनी यांचे तोंडी रिपोर्टवरुन पोस्टे डुग्गीपार येथे अप. क. 210/2024 कलम 279, 304 (अ) भा.द.वी सह कलम 134, 177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा/1192 आनंद दामले पोस्टे डुग्गीपार हे करीत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें