सडक अर्जुनी, दि. 13 जुन : डूग्गीपार पोलिस स्टेशन च्या हद्दीत येणारे सडक अर्जुनी येथील प्रणय मडावी यांचे बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर डूग्गीपार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर धाड टाकली यात 7 आरोपी सह 31 हजार 350 रुपये आणि 50 तास पत्ती असा मुद्देमाल मिळून आला.
ही कारवाई 12 जुन रोजी 9 : 20 वाजता दरम्यान करण्यात आली. असून आरोपी विरुद्ध तक्रार क्रमांक : 212/2024 कलम् 4, 5 महा जुगार कायदा अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नापोशी घनश्याम मुळे बक्कल नंबर 1709 पोस्टे डुग्गीपार यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणातील आरोपी नामे 1) मनोज प्रल्हाद शेंडे वय 35 वर्ष रा. सानगडी, 2) मिलिंद नरेश राऊत वय 30 वर्ष रा. सडक अर्जुनी, 3) अमित गोवर्धन बनसोड वय 34 वर्ष रा. केसलवाडा, 4) ज्ञानेश्वर निंबेकर रा. सडक अर्जुनी, 5) वीरेंद्र गोर रा. सडक अर्जुनी, 6) सुमित बनसोड रा. सावंगी, 7) प्रणय कैलास मडावी रा. सडक अर्जुनी असे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 1) मनोज प्रल्हाद शेंडे, 2) मिलिंद नरेश राऊत, 3) अमित गोवर्धन बनसोड हे आरोपी मिळून आले. तर आरोपी 4) ज्ञानेश्वर निंबेकर 5) वीरेंद्र गोर, 6) सुमित बनसोड, 7) प्रणय कैलास मडावी हे पळून गेले आहेत. त्यांच्यावर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनात कारवाई पथक, पोलिस निरीक्षक मंगेश काळे, पोलिस उप नीरीक्षक बांबोळे, पोलिस हवालदार दीपक खोटेले, जगदीश बिसेन, घनश्याम उईके, घनश्याम मुळे, आशिष अग्निहोत्री, यांनी सापळा कारवाई केली आहे. तपास पोहवा दीपक खोटेले करीत आहे.