तिडका परिसरातून जाणाऱ्या चुलबंद नदीतून रेती चोरी जोमात.

प्रशासनाने कारवाई न केल्यास सरपंच सह गावकर्यानी दिला आंदोलनाचा इशारा

गोंदिया, दी. 12 जून 2024 : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्या बाबत माध्यमांनी अनेकवृत्त प्रकाशित केले आहे. तरी देखील स्थानिक प्रशासन निंद्रा अवस्थेत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ग्राम तिडका शेत शिवारातून जाणाऱ्या चुलबंद नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. ही रेती नदीत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीजवळून तसेच मोटार पंपाजवळून उपसा केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी व मोटार पंपांना धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी सांगितलं की अनेक वेळा मोटार पंपाला लावलेले पाईप तसेच वायर चोरी झाले आहे.

2024 मध्ये गोंदिया जिल्ह्यात एकही रेती घाट लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळेच जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बांधकामांना रेतीची आवश्यकता आहे. परंतु ही रेती चोरीच्या माध्यमातून बांधकामाच्या ठिकाणी पोहोचवली जाते. आणि हे काम रात्रीच्या अंधारात मोठ्या सीताफिने केले जाते. विशेष म्हणजे नदीपात्रातून रेतीचा उपसा ट्रॅक्टरच्या सहाय्याने केला जातो तर नदीपात्र बाहेर सदर वाळू डम्पिंग केली जाते. डम्पिंग केलेली रेती जेसीबी चे साह्याने ट्रकमध्ये भरून ही वाळू तालुक्या बाहेर विक्रीसाठी पाठवली जाते.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. मात्र सततच्या वाळू उपशाने नदीपात्र खोल होत आहेत. तर शेतकऱ्यांच्या जमिनी देखील नदीपात्रात सामावून जाण्याची भीती वर्तवली जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांच नुकसान होत आहे. तर दुसरीकडे रोज महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. असे असले तरी तालुका प्रशासन या भागात कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई न केल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दी. 11 जून रोजी सरपंच सह गावकऱ्यांनी दिला आहे. यावेळी सरपंच नीतेस गुरनुले, शेतकरी सुभाष मोहूरले, जनार्दन मोहूरले, प्रेमलाल मोहूरले, रिणा मोहूरले, कवींद्र मोहूरले उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें