भाविकांच्या बस वर हल्ला करणाऱ्या आतंक वाद्याचा पुतळा जाळून बजरंग दल ने केला निषेध

गोंदिया, दी. 12 जून 2024 : जम्मू काश्मीर मध्ये दोन दिवसा आधी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बस वर गोळीबार करून हल्ला केला यात १० भाविकांचा मृत्यू झाला याच घटनेच्या निषेधार्त दी. 12 जून रोजी गोंदियात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दहशतवाद्याचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर रविवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. असता या हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला होता.

तर ३३ भाविक जखमी झाले होते. वैष्णो देवी आणि शिवखेडी धामचे दर्शन करुन परत येत असताना भाविकांच्या बसवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून बचावलेल्या भाविकांनी त्यांचा अनुभव सांगितला. शिवखोडी वरुन कटरा परत येत असलेल्या बसवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी दबा धरुन बसले होते.

ही बस रियासी मध्ये पोहोचली त्यावेळी भर रस्त्यावर उभं राहून चार दहशतवाद्यांनी बस वर गोळीबार सुरु केला. या मध्ये ड्रायव्हरला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली त्या नंतर ही अंधाधुंद गोळीबार सुरुच होता. या माघे पाकिस्तनाचा हात आहे. अश्या भावना हिंदू संघटनांनी व्यक्त केल्या असून केंद्र सरकारने या कडे लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी देवेश मिश्रा बजरंग दल विदर्भ प्रमुख, सुभाष पटले जिल्हा संयोजक बजरंग दल सह अन्य उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें