पत्रकारांसाठी वन विषयक अभ्यास दौरा 19 जूनला, ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य. 

संग्रहित छायाचित्र

गोंदिया, दि.12 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत नोंदणीकृत पत्रकारांकरीता वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौऱ्याचे आयोजन भंडारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी 18 जून व गोंदिया जिल्ह्यातील पत्रकारांकरीता 19 जून 2024 रोजी करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुक पत्रकारांनी 13 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते 16 जून 2024 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पत्रकारांकडून आवेदन स्विकारण्यात येतील. त्याकरीता प्रशासनाच्या सोईकरीता ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. सदर आवेदन फॉर्म ऑनलाईन पध्दतीने रजिष्ट्रेशन करण्याकरीता सोबत QR कोड उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

त्यासाठी वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौरा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील इच्छुक पत्रकारांनी याची नोंद घ्यावी. विशेष माहितीकरीता www.nawegaonnagzira.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक पवन जेफ यांनी कळविले आहे.

Leave a Comment

और पढ़ें