NEET परिक्षेत झालेल्या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा : युवक कॉंग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

गोंदिया, दी. 12 जून : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विद्यार्थांना NEET परिक्षेत झालेल्या घोट्याळाचा मोठा फटका बसला असुन त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झालेल्या लाखो विद्यार्थांवर अन्याय झाला आहे. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थांवरही अन्याय झाला असुन सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे.

NEET परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वकष व निष्पक्ष चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमुल्यांकन करुन ग्रेस पद्धति बंद करण्यात यावे. एका परिक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निगेटिव मार्कींग सिस्टीममुळे एक उत्तर चुकले तरी पण 5 मार्क कमी होतात. परंतु काही विद्यार्थांना 716, 718 गुण मिळाल्याचेही दिसत आहे. यामुळे हा प्रकार संशयास्पद वाटतो. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. ज्या विद्यार्थांनी प्रामाणिकपणे अभ्यास करुन ही परीक्षा दिली त्यांच्यावर हा एक प्रकारे अन्यायच आहे.

सखोल चौकशी होई पर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात यावी व या गैरकारभारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा आशयाचे निवेदन अर्जुनी/मोरगाव तालुका युवक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांचे मार्फत राष्ट्रपती महोदयांना आज 12 जून रोजी पाठविण्यात आले आहे.

निवेदन देते वेळी गोंदिया जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड, तालुका कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष कृष्णाभाऊ शाहारे, तालुका युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेश हत्तीमारे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष आशीष कापगते, अर्जुनी/मोरगाव नगपंचायतचे नगरसेवक अतुल बन्सोड, शिलाताई उईके, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले यांचे सह कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें