प्रॉपटी व्यावसायिकाच्या हत्ते प्रकरणी चार आरोपी अटक

आर्थिक देवाणघेवानीच्या व्यवहारातून झाली हत्या. 

गोंदिया, दि. 10 जुन : छोटा गोंदिया भागात राहणाऱ्या प्रॉपटी व्यवसायिक महेश दखने याची काल 09 जुन रोजी सकाळी 9 : 45 वाजता हत्या करण्यात आली. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी चार आरोपीला अटक केली आहे. सदर प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. छोटा गोंदिया भागात राहणारा 34 वर्षीय महेश दखने हा प्रॉपटी खरेदी विक्री चा व्यवसाय करिता होता. काल सकाळी काही कामा निमित्त तो घराजवळून जाणाऱ्या बायपास वर असलेल्या किसान चौक या ठिकाणी थांबला होता. दरम्यान चार अज्ञात इसमांनी दुचाकी वरून येत महेश च्या डोक्यावर हातोड्याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले.

जख्मी अवस्थेत आरडा ओरड करताच रस्त्यावरून जाणारे लोक जमा झाले असता दरम्यान सर्व आरोपी पळाले. महेश ला जखमी अवेस्थेत पाहता याची माहिती काही लोकांनी गोंदिया शहर पोलिसांना दिली. सामाजिक कार्यकर्ते लोकेश यादव यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी महेश दखनेला गोंदिया शहराच्या मामा चोक भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. 09 जुन च्या रात्री उशिरा त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता काही तासातच चार आरोपीना अटक केली आहे.

यात गोंदिया शहरात राहणारा 48 वर्षीय मुख्य आरोपी देवा कापसे, आमगाव तालुक्याच्या चिरचाळ बांध गावात राहणारा 32 वर्षीय सुरेंद्र मटाले, 26 वर्षीय मोरेश्वर मटाले राहणार मोहगांव तर 38 वर्षीय नरेश तरोणे गोंदिया या चार आरोपीने महेश दखने यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या आधी देखील मृतकावर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपी विरुद्ध देखील एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती उप विभागीय पोलिश अधिकारी रोहिणी बानकर यांनी दिली आहे. फिर्यादी कामीनी महेश दखने यांचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप 365/2024 कलम 307, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल कारण्यात आला होता. महेश दखने गंभीर जखमी असल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने गुन्ह्यात कलम 302 भा.दं.वि. अन्वये वाढ करण्यात आली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें