बाम्हणी/खडकी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजिन

गोंदिया, दि.10 जुन : निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून नित्यानंद झा अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, मंगेश काळे सा. ठाणेदार पोस्टे डुग्गीपार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 09 जुन रोजी “क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिवस” निमित्त गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिडकी योजना ( एक हात मदतीचा ) माध्यमातून पोलीस स्टेशन, डुग्गीपार अंतर्गत नक्सलग्रस्त मौजा बाम्हणी/खडकी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंडा येथील डॉ. सुशांत ठाकरे, डॉ. अमिता नरडेले, दीप्ती उपराडे आणि त्यांची मेडिकल टीम मार्फत गावातील नागरिकांना बीपी, सुगर, सिकलसेल व इतर रोगांच्या तपासण्या करून औषधे देण्यात आले. सदर शिबिरात 130 ते 135 महिला, पुरुष व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. सदर कार्यक्रमात डुग्गीपार पोलीस स्टेशन येथील सपोनी बांबोळे, पोहवा मेश्राम, पोना सोनवाने, पोशी रुखमोडे, पवार, राखडे, मापोशी बन्सोड, ठाकूर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें