खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत सेल्फी घेत फेसबुक वर केली पोस्ट

गोंदिया, दि. 09 जुन : भंडारा -गोंदिया जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत सेल्फी घेत फेसबुक वर 2 पोस्ट केल्या आहेत. 4 जून रोजी संपूर्ण देशात लोकसभेचे मिश्र निकाल आले. त्यामुळे देशामध्ये परिवर्तनाची लाट पाहायला मिळाली आणि त्याच्यातच भाजपच्या खासदाराचा पराभव करत डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी 37 हजार मतांनी विजयी होत खासदारकी काबीज केली.

या मागे नाना पटोले यांची कारकीर्दी अत्यंत महत्त्वाची ठरली. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व खासदारांना दिल्ली येथे बैठकीसाठी बोलावलं होतं. दरम्यान दिल्ली येथे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत सेल्फी काढत सदर फोटो फेसबुक या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज, यांच्याशी संसद भवनात भेट झाली. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची आवड मनात रुजली आणि आपणही देशासाठी योगदान द्यावं ही संकल्पना फळाला आली अशा आदर्श व्यक्तिमत्वांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. असे प्रशांत पडोळे केलेल्या पोस्टमध्ये म्हणतात.

तर संसद भवनात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेकांची भेट घेतली राहुलजींनी व्यक्तिशः अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. असंही त्यांनी केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

देशात लोकसभेचे निकाल आल्या नंतर बरेच बदल झाले. इंडिया गट बंधन ची सरकार बसेल असा विश्वास अनेकांना होता. परंतु एनडीए म्हणजेच भाजप समर्थित नरेंद्र मोदी यांची सरकार तिसऱ्यांदा देशात बसणार आहे. आज 09 जून रोजी सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तर अनेक नव्या मंत्र्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात राहून काम करणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें