गोंदिया, दी. 08 जून 2024 : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची प्रतीक्षा नागरीक करत होते, काल मृग नक्षत्राच्या प्रारंभातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकडापासून निश्चितच दिलासा मिळाला होता. मात्र आज दुपारी पुन्हा उन्हाचा तडाखा बसला, त्यानंतर संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह आलेल्या पावसामुळे वातावरण थंड झाला असून मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 407