भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेने प्रफुल पटेल यांची औकात काय आहे ते दाखवून दिली : नाना पटोले

  • भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेने प्रफुल पटेल यांची औकात काय आहे ते दाखवून दिली : नाना पटोले
  • “नाना पटोले” सारख्या चिल्लर नेत्यांनी’ मोदीजींवर बोलणं हे योग्य नाही – परीनय फूके माजी मंत्री

गोंदिया, ( बबलु मारवाडे : महाराष्ट्र केसरी न्युज डिजीटल ) दि. 07 जुन 2024 : 4 जून रोजी लोकसभेचे निकाल आल्यानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांनी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे साधे सुधे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नसून मांजी मंत्री दर्जाचे नेते असल्याने अधिकच ट्रोल होत आहेत.

यात भाजपचे माजी मंत्री परिणय दादा फुके आणि माजी मंत्री प्रफुल पटेल यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सदर व्हिडिओ कुणी स्टेटस वर ठेवले तर कुणी व्हाट्सअप वर व्हायरल करीत आहेत. विशेष म्हणजे हे व्हिडिओ विविध चॅनेलच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.

भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेने प्रफुल पटेल यांची औकात काय आहे ते दाखवून दिली : नाना पटोले

प्रथम आपण पाहणार आहोत की माजी मंत्री प्रफुल भाई पटेल यांनी एका सभे दरम्यान भंडारा गोंदिया येथील नेत्यांची अवकात काढली होती. म्हणजे नकळत त्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती दरम्यान जनतेत चर्चेला उधाण आले होते.

ते म्हणाले मोठी घोषणा करतात त्यांनी आपल्या तालुक्याचा भला केला नाही तर जिल्ह्याचा विकास करणे फार दूरची गोष्ट झाली. आणि म्हणून मित्रांनो आम्ही पाहतो ना कोण किती औकातचा माणूस आहे.

याच व्हिडिओचा रेफरन्स देत नाना पटोले यांना एका पत्रकाराने विचारणा केली असता नाना पटोले म्हणाले त्यांना या जिल्ह्यातील जनतेने नेता केलं होतं आणि या जिल्ह्यातील जनतेची त्यांनी औकात काढली होती म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेने प्रफुल पटेल यांची औकात काय आहे ते दाखवून दिली आहे. असे स्टेटमेंट नाना पटोले यांनी दिले आहे.

“नाना पटोले” सारख्या चिल्लर नेत्यांनी’ मोदीजींवर बोलणं हे योग्य नाही – परीनय फूके माजी मंत्री

तर दुसरा व्हिडिओ पाहिल्यास नाना पटोले मिडीयाला स्टेटमेंट देतात की भंडारा गोंदिया लोकसभा ही काँग्रेस पक्ष जिंकेल आणी त्या बद्दल चि तयारी सुरू झाली आहे. आम्ही आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्याची जनता ही सातत्याने अन्यायाच्या विरोधात लढणारी राहिली आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ही निवडणूक बीजेपी काहीही रणनीती करेल तरी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनता ही काँग्रेसच्या उमेदवारालाच मतदान करेल आणि त्यांच विश्वास आमच्या प्रती आहे. आणि त्या आधारावर या निवडणुका होतील त्याच्यामुळे इथे मोदी पण उभे झाले तरी त्यांना इथून हारूनच जावे लागेल ही मानसिकता आमच्या भंडारा गोंदिया इथली आहे. असे ते माध्यमाशी बोलले होते.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यवर प्रसार माध्यमातील प्रतिनिधींनी माजी मंत्री परीनय दादा फुके यांना विचारणा केली असता ते म्हणाले – तुमच्यात जर हिम्मत असणार आणि तुम्ही जर स्वतःला नेते समजत असणार तर तुम्ही स्वतः काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात यावे तुम्हाला तुमची लायकी माहित होऊन जाणार जगात आज मोदीजींचा मान आहे. पण नाना पटोले सारख्या चिल्लर नेत्यांनी मोदीजींवर बोलणं हे योग्य नाही. नाना पटोलेजी यांना जर वाटत असेल की ते नेते आहेत त्यांनी लोकसभा लढवून दाखवावी आणि त्यांना माहीत होणार की त्यांची डिपॉझिट देखील राहणार नाही. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता देखील नाना पटोलेजिंची डिपॉझिट लोकसभेमध्ये गोल करून देणार हे मी आपल्याला दाव्याने सांगतो. अस स्टेटमेंट परीने दादा फुके यांचा होता.

काँग्रेस पक्षाने डॉक्टर प्रशांत पडोळे सारखा एक “डमी उमेदवार” दिल्यामुळे इतक्या कमजोर उमेदवाराच्या विरोधात लढायचं नाही असं मी ठरवलं : माजी मंत्री परिणय दादा फुके 

त्याच बरोबर परिणय दादा फुके माजी मंत्री यांचा दुसरा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते मीडियाला स्टेटमेंट देताना बोलतात की गोंदिया भंडारा या मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे निवडणूक लढणार होते. पण त्यांनी काल रात्री ही घोषणा केली की ते ही निवडणूक लढणार नाही. आणि म्हणून मी माझ्या पार्टीला विनंती केली की ही निवडणूक लढण्यास मी इच्छुक नाही. आजच दुपारी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत फोनवर चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की मला ही निवडणूक आता लढायची नाही. कारण काँग्रेस पक्षाने डॉक्टर प्रशांत पडोळे सारखा एक “डमी उमेदवार” दिल्यामुळे इतक्या कमजोर उमेदवाराच्या विरोधात लढायचं नाही असं मी ठरवलं. पक्षाने कुणा दुसऱ्या उमेदवाराला तिकीट द्यावी आणि ते सहजरीत्या निवडून येतील अशी मी पक्षाला विनंती केली आहे. असा देखील एक स्टेटमेंट परीने दादा फुके यांनी मीडियाला दिला होता.

हे व्हिडिओ काँग्रेस पक्षाला आणि नेत्यांना चेलेंज देणारे ठरले होते. कदाचित काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे जर ही निवडणूक हरले असते तर या व्हिडिओला अधिक महत्त्व आले असते. परंतु काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी कुठलीही भूमिका नसताना देखील जनतेने त्यांना भरभरून मताने निवडून दिले आहे.

जनतेचा कल हा भाजप पक्षाच्या विरोधात असल्यामुळे काँग्रेसचे एक नाही तर अनेक उमेदवार भरघोस मताधिक्याने निवडून आले आहेत. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार नामदेवराव किरसान, चंद्रपूर येथील प्रतिभाताई धानोरकर सह अनेक काँग्रेसचे नेते भरगोस मताधिक्याने निवडून आले आहेत आणि याचा फटका भाजप पक्षाला बसला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची काय भूमिका असणार आणि बीजेपी पक्ष कुठल्या रणनीतीचा वापर करणार हे पाहण्यासारखे असेल.

5 जून रोजी नाना पटोले यांचा जन्मदिवस त्यांचे स्व; गावी सुकळी येथे मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला होता. दरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत शुभेच्छा दिल्या. म्हणजेच येत्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये देखील नाना पटोले आपला जादू दाखवनार त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या स्टेटमेंट मध्ये सांगितले आह की काँग्रेस पक्ष राज्यात 150 जागा लढणार आहे. पटोले यांचा पुन्हा जादू चालल्यास. त्यांना मुख्यमंत्री होण्यास कुणीही रोखू शकणार नाही हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

और पढ़ें